एज्यु-टेक अग्रो फौंडेशन वृक्षारोपण अभियानांतर्गत १५ ऑगस्ट २०१६ रोजी काळवाडी ग्रामस्थांच्या संयुक्त सहभागातून काळवाडी उंब्रज शिव ओढा ते काळवाडी पिंपळवंडी शिव ओढा रस्त्याच्या दोन्ही बाजूने वृक्षारोपण करण्यात आले. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार प्रामुख्याने यामध्ये नारळाच्या झाडाना पसंती देत,नारळाच्य १११ रोपांसह एकूण २११ झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले.सर्व सहभागी ग्रामस्थांचे एज्यु-टेक अग्रो फौंडेशनच्या वतीने हार्दिक आभार...तसेच आम्ही रस्त्याने जाणार्या येणाऱ्या सर्व प्रवाश्यांना व सबंधित शेतकर्यांना या झाडांकडे लक्ष देण्याचे व जगविण्याचे आव्हान करतो.मिळालेल्या प्रतिसादावरून वसहभागातून आपणाकडून या झाडांचे नक्कीच संगोपन केले जाईल यात शंका नाही.^GALLERY:3^